Cabinet Meeting : सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

अवकाळीमुळ संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

एमपीसी न्यूज : राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) आज पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. 10  मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मदत व पुनर्वसन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Alandi : माऊली मंदिरात अखिल भारतीय सैनिक सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता

कृषी मंत्री  अब्दुल सत्तार म्हणाले,  पाऊस पडून जे शेतकऱ्यांचे नुकसान होतं. यावर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाली. सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव  कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मांडण्यात आल. त्यावर चर्चा झाली त्यामध्ये आणखी बदल केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबद्दलच्या अंतिम निर्णय अवघ्या काही दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले,  शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.(Cabinet Meeting) ज्या पीकांचे नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळायची नाही त्या पिकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

 

मंत्रिमंडळ बैठकीतीन इतर महत्त्वाचे निर्णय

ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद. (महसूल विभाग)

नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता. 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार. (नगर विकास-1)

देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल. (नगर विकास-1)

सेलर इन्स्टीट्यूट “सागर” भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण. (महसूल)

अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदे निर्माण करणार. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये

महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी. (ऊर्जा)

अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण)

नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.