Alandi : माऊली मंदिरात अखिल भारतीय सैनिक सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता

एमपीसी न्यूज : आळंदी येथील माऊलीं मंदिरामध्ये (Alandi) अखिल भारतीय सैनिक सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन 31 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत करण्यात आले होते. महाराष्ट्रातील माजी सैनिकांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.

दि.31 मार्च रोजी ह भ प भाग्यवान महाराज म्हस्के ,1 एप्रिल रोजी ह भ प वसंत थोरमिसे ,2 एप्रिल रोजी  ह भ प कर्नल व्यंकटराव खाडगे,3 एप्रिल  रोजी ह भ प पंडित स्वामी शिवदास कन्हेरे ,4 एप्रिल रोजी हनुमंत आप्पा पवार यांची किर्तन सेवा संपन्न झाली. तर आज दि.5 रोजी ह भ प डॉ.ब्रिगेडियर सुनील बोधे यांच्या काल्याच्या किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

DC-GT : मिलर आणि साई सुदर्शन यांच्या मदतीने गुजरातचा दिल्लीवर विजय

मंदिरामध्ये आकर्षक अशी रांगोळी यावेळी काढण्यात आली होती. (Alandi) सकाळी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचा फ्रुटवाले धर्मशाळेत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी धर्मशाळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.