Maharashtra Police : उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण 58 पदकं

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. : Maharashtra was awarded five 'Presidential Police Medals' for outstanding service; The state won a total of 58 medals

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (शुक्रवारी, दि. 14) पोलीस पदकांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 14 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते.

यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली असून 80 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 215 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 58 पदक मिळाली आहेत.

देशातील 80 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

# ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)

रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक, पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, चव्हाण नगर, पुणे.

संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कुलाबा, मुंबई.

सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.

विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.

गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, (PAW Wing), लातूर.

# राज्यातील एकूण 14 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

राजेश ज्ञानोबा खांडवे, पोलीस उपनिरीक्षक

मनीष पुडंलिक गोरले, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

गोवर्धन जनार्दन वधाई , पोलीस कॉन्स्टेबल

कैलास काशीराम ऊसेंडी , पोलीस कॉन्स्टेबल

कुमारशहा वासुदेव किरंगे, पोलीस कॉन्स्टेबल

शिवलाल रुपसिंग हिडको, पोलीस कॉन्स्टेबल

सुरेश दुर्गजी कोवासे, हेड कॉन्स्टेबल

रतीराम रुघराम पोरेटी , हेड कॉन्स्टेबल

प्रदीपकुमार रायभाम गेडाम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

राकेश महादेव नारोटे, कॉन्स्टेबल

राकेश रामसु हिचामी, नाईक

वसंत नानका तडवी, कॉन्स्टेबल

सुभाष पाडुरंग ऊसेंडी, कॉन्स्टेबल

रमेश वेनकन्ना कोमीरे, कॉन्स्टेबल

# राज्यातील एकूण 39 पोलिसांना ‘पोलीस पदक’

विनायक बद्रीनारायण देशमुख, सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महासंचालक पोलीस कार्यालय, कुलाबा मुंबई

शिरीष एल. सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, झोन 2, पुणे

तुषार चंद्रकांत दोशी, मुख्याध्यापक / पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अंधेरी पूर्व, मुंबई

नरेंद्रकुमार किसनराव गायकवाड, पोलीस उपअधीक्षक –रेल्वे, पुणे

मोहम्मद इलियास मोहम्मद सईद शेख, सहायक कमांडंट, एसआरपीएफ, जीआर 14, औरंगाबाद

सुनील भगवान यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त, एटीएस पुणे.

सादिक अली नुसरत अली सईद, सहाय्यक कमांडंट, एसआरपीएफ, जीआर – 1, पुणे.

डागुभाई महमद शेख, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद.

प्रतिभा संजीव जोशी, पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे

संजय नारायण धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबरनाथ पोलीस स्टेशन, अंबरनाथ

डॉ. सिताराम शंकर कोल्हे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट, नाशिक

केदारी कृष्ण पवार, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर

सुनील किसनराव धनावडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग

अनिल प्रल्हाद पतरूडकर, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी.,पुणे

सूर्यकांत गणपत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी.बी. मार्गे पोलिस स्टेशन, मुंबई

हरीश दत्तात्रय खेडकर, पोलीस निरीक्षक ए.सी.बी अहमदनगर,

अशोक लालसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस स्टेशन, नवी मुंबई

अरविंद धोंडीबा अलहत, पोलीस निरीक्षक-वायरलेस, पोलीस वायरलेस, पुणे

विनय बाबूराव घोरपडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर

शालिनी संजय शर्मा ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नागपाडा पोलीस स्टेशन, मुंबई

विलास विठ्ठल पेंडुरकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई

मच्छिंद्र सारंगधर रानमाळे, पोलीस उपनिरीक्षक, चाळीसगाव पोलीस स्टेशन जळगाव

वीरेंद्रकुमार श्रीकृष्ण चौबे, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन, अमरावती ग्रामीण

संजय सदाशिव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे शहर

प्रकाश नरेश एरम, सशस्त्र उपनिरीक्षक, एस.आर. पी.एफ. जीआर II, पुणे

भाऊसाहेब रामनाथ इरंडे, पोलीस उपनिरीक्षक, बी.डी.डी.एस. औरंगाबाद ग्रामीण

रमेश रामजी बर्डे, सहाय्यक उपनिरीक्षक, बल्हारशाह पोलीस स्टेशन चंद्रपूर

संदीप मनोहरलाल शर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा स्टेशन, चंद्रपूर,

जनार्दन देवाजी मोहूर्ले, सहायक उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर

श्याम गणपत वेताळ, सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर. नाशिक

विश्वास दिनकरराव भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक, चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई

विजय वासुदेव खर्चे, सहायक उपनिरीक्षक, शहर कोतवाली पोलिस स्टेशन, मुंबई

रऊफ समाद शेख, सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, अहमदनगर

मोईनुद्दीन फरुद्दीन तांबोळी, सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, जालना

पांडुरंग बाबुराव कवळे, सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर., नाशिक

कैलास मोहनराव सनाणसे, सहाय्यक उपनिरीक्षक, कॅन्ट वाहतूक शाखा, औरंगाबाद

दिलीप राधाकिशन चौरे, सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, औरंगाबाद

सुनील शामकांत पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक, एस.डी.पी.ओ. कार्यालय जळगाव

तात्याराव बाजीराव लोंढे, हेड कॉन्स्टेबल (गुप्तचर अधिकारी) एस.आय.डी औरंगाबाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.