Maharashtra : ठाकरे गटासाठी आज महत्त्वाचा दिवस; सर्वोच्च न्यायालयात महासुनावणी!

एमपीसी न्यूज : राजकीय सत्तासंघर्षात सुरू (Maharashtra) असलेला वाद अजूनही कोर्टात चालू आहे. आजचा दिवस उद्धव ठाकरे गटासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाकडे 7 न्यायमूर्तीपीठाच्या केलेल्या मागणीवर आज कोर्टात निर्णय होणार आहे. त्यांची मागणी कोर्ट मान्य करणार का? त्यांचा अपेक्षाभंग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आधी 2 न्यायमूर्तींच्या व्हँकेशन बेंचपासून सुरू झालेला हा वादात्मक प्रवास त्रिसदस्यीय आणि नंतर 5 न्यायमूर्तींचे घटनापीठ इथपर्यंत येऊन थांबला. आता जर कोर्टाने ठाकरे गटाची विनंती मान्य केली, तर 7 न्यायमूर्तींचे बेंच त्यांना मिळणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगासाठीही आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

निवडणूक आयोगात आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी (Maharashtra) कागदपत्रं सादर झालेली आहेत. आता प्रत्यक्ष सुनावणीला, युक्तीवादांना सुरुवात कधी होणार? याच उत्तर आज मिळणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण कोणाकडे जाणार? या प्रश्नालाही मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आज न्यायालयात ठाकरे गटाच्या बाजूने कौल मिळतोय का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune Rape Case : युपीमधून उपचारासाठी आलेल्या महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.