Pune Rape Case : युपीमधून उपचारासाठी आलेल्या महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये उपचारासाठी (Pune Rape Case) आलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून निसर्गोपचारासाठी पुण्यात आलेल्या 39 वर्षीय सामाजिक महिला कार्यकर्त्यावर बंदुकीच्या धाकाने बलात्कार करण्यात आला. महिलेने फिर्याद देताच हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

संजय बाजीराव भोसले (वय 52, रा. उरुळी कांचन) असे अटक आरोपीचे नाव आहे. हडपसर येथील जयप्रकाश सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उत्तर प्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या आहे. तिला मणक्याचा त्रास आहे. सुरुवातीला अॅलोपॅथी उपचार घेतल्यानंतर तिने उपचारासाठी निसर्गोपचार केंद्रात येण्याचे ठरवले. त्यानुसार ती उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचारासाठी आली.

त्यावेळी तिला राहण्यासाठी भाड्याने खोली हवी होती. त्यामुळे महिलेने संजय भोसले यांना खोलीबाबत विचारणा केली. खोली दाखवण्याच्या बहाण्याने भोसलेने तिला बोलावले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (Pune Rape Case) करीत आहेत.

Today’s Horoscope 10 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.