Today’s Horoscope 10 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 January 2023 
वार – मंगळवार.
10.01.2023
शुभाशुभ विचार- 12 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- अंगारक चतुर्थी.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – आश्लेषा 9.01 पर्यंत नंतर मघा.
चंद्र राशी – कर्क 9.01 पर्यंत नंतर सिंह.
—————————————-
मेष – (शुभ रंग – मोतिया)
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. गुढ शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांना एखादी प्रचिती येईल.

वृषभ (शुभ रंग – राखाडी)
कौटुंबिक स्तरावरील काही मना सारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. पुरेसा पैसा ही उपलब्ध होईल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून पालक सुखावतील.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)
बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालावे लागेल. कदाचित वाहन दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. मुलांना अभ्यासाचा कंटाळा येईल.

कर्क (शुभ रंग- हिरवा)
आज राशीच्या धनस्थानात प्रवेश करणारा चंद्र काहीतरी आकस्मिक लाभ देईल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस गृहिणी आनंदाने करतील. शब्द जरा जपून वापरा.

सिंह (शुभ रंग- मोरपंखी)
तुमच्या वागण्यात इतरांना जरा अहंपणा जाणवेल. आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. अति स्पष्ट बोलल्यामुळे आज तुमचे हितचिंतकच दुखावतील.

कन्या (शुभ रंग- चंदेरी)
कंजूषणा करून चालणार नाही आज काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. उच्च अधिकारी वर्गास आज कार्यालयीन कामासाठी दूरवरचे प्रवास घडतील.

तूळ (शुभ रंग – निळा)
तुमची काही विसरलेली येणी आज अनपेक्षितपणे वसूल होतील. नवविवाहितांची संसारिक स्वप्ने साकार होतील. नवीन व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)
आज कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या अंगी असलेले नेतृत्व गुण कामी येतील. कामाच्या व्यापात कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होईल.

धनु (शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रात काही विरोधी घटनांना तोंड द्यावी लागले तरी तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी.

मकर (शुभ रंग- सोनेरी) – Today’s Horoscope 10 January 2023 
कार्यक्षेत्रात आज काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागेल नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. कोणत्याही प्रकारचे धाडस आज तरी नको. फक्त नाकासमोर चाला.

कुंभ (शुभ रंग – पिस्ता)
आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील काही खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील सतर्क रहा. वैवाहिक जीवनात दोघात तिसरा अजिबात नको.

मीन (शुभ रंग – सोनेरी)
आज तुम्हाला काही आरोग्य विषयक समस्या त्रस्त करतील डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणे आवश्यक आहे.धंद्यातील काही येणे आज अनपेक्षितपणे वसूल होतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Nigdi News : निगडी येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस जन्मठेपेची शिक्षा 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.