Nigdi News : निगडी येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस जन्मठेपेची शिक्षा 

एमपीसी न्यूज :  निगडी प्राधिकरण येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने महिलेवर कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केल्याची घटना निगडी प्राधिकरण येथे 2011साली घडली होती. (Nigdi News) या गुन्ह्यातील आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश वडगाव मावळ यांनी सोमवारी (दि.9) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपये दंड, पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यासाठी तीन महिने साधा कारावास आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे सक्षम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आरोपी लक्ष्मण वाघ, रा. गणेश तलाव, आकुर्डी, मूळ रा. मु. पो. फुलारवाडी, ता. पाथरी, जि. परभणी याला जन्मठेपेची शिक्षण सुनावण्यात आली आहे.तर शितल विनय ओहोळ (वय-32 रा. काळेश्वर सोसायटी, सेक्टर नं. 26, निगडी प्राधिकरण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 26 ऑगस्ट 2011 रोजी दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या सुमारास घडली होती. आरोपीने शितल यांचा खून केल्यानंतर सोन्याचे दागिने व मोबाइल असा एकूण 2 लाख 14 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत मृत महिलेचे पती विनय भाऊसाहेब ओहोळ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यातफिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी केला होता.

Pune news : उद्यापासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी लक्ष्मण वाघ हा मयत शितल ओहोळ यांच्या घरासमोर असलेल्या महादेवाच्या मंदिरात बराच वेळ विनाकारण बसत होता, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा आकुर्डी, प्रधिकरण परिसरता शोध घेतला परंतु तो सापडला नाही. (Nigdi News) त्यामुळे पोलिसांच्या एका पथकाने त्याच्या मुळगावी जाऊन त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला 19 सप्टेंबर 2011 रोजी अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी स्वतः केला असून पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव सहायक फौजदार किरण आरुटे, नेमणूक मुख्यालय पिंपरी चिंचवड, पोलीस हवालदार सतीश कुदळे, पोलीस हवालदार दादा जगताप यांनी मदत केलेली आहे. सरकारी वकील पाठक यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली असून कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार अल्ताफ सध्या नेमणूक लोणावळा पोलीस ठाणे व पोलीस हवालदार बाळू तोंडे नेमणूक देहू रोड पोलीस ठाणे यांनी काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.