Update: पिंपरीत कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; दाेन जखमी

Major accident of car and tempo in Ambedkar chowk, Pimpri.

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि. 24) दुपारी भीषण अपघात झाला. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणात सुरुवातीला एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांनी महिलेचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले.

सुमन दौंडकर, मनोहर दौंडकर (दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी दुपारी एक तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुमन आणि मनोहर हे गंभीर जखमी झाले. जखमींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामध्ये टेम्पो बीआरटी मार्गाच्या दुभाजकावर गेला असून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळली आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.