Manobodh by Priya Shende Part 45 : जयाचेनि संगे समाधान भंगे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 45 (Manobodh by Priya Shende Part 45)

जयाचेनि संगे समाधान भंगे

अहंता अकस्मात येउनी लागे

तये संगतीची जनी कोण गोडी

जिये संगतीने मती राम सोडी


मागच्या श्लोकात समर्थांनी, माैन धर, असा उपदेश केला होता. आता या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 45) समर्थ माणसाच्या संगती विषयी भाष्य करत आहेत.

संगत माणसासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करते. ज्या संगतीत असु, त्याचे परिणाम कळत नकळत आपल्यावर होत असतात. चांगली संगत असेल तर चांगले परिणाम होतील. वाईट सांगत असेल तर वाईट परिणाम होतील. मोरोपंतांनी लिहून ठेवलं आहे की,

सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो l
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो ll

आपल्याला कायम सुसंगत, संतसंगत मिळावी.. चांगली वाक्य कानावर पडावीत. डोक्यातले वाईट विचार निघून जावेत आणि आपण विषय वासनेपासून कायम दूर राहवं, यासाठी सदैव प्रयत्नात असायला हवा.

समर्थ म्हणताहेत की, “जयाचेनि संगे समाधान भंगे”

माणसाला समाधान पाहिजे असतं. शांती, समाधान याच्या शोधात तो सतत फिरत असतो. समर्थ म्हणतात की तू, अशा लोकांच्या संगतीत राहू नकोस, जिथे तुझं समाधान भंग पावेल.

Todays Horoscope 26 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

पुढे ते म्हणतात की, “अहंता अकस्मात येउनी लागे”. आपण श्रीमंत माणसांच्या संगतीत आलो तर, आपल्यालाही श्रीमंत व्हावं असं वाटतं. श्रीमंत होणं वाईट नाही. पण त्या माणसाची इर्षा धरून, कोणताही मार्ग स्वीकारून, जर त्याच्यासारखा श्रीमंत व्हायचंय असं ठरवलं तर, एक तर तुम्ही चुकीचा मार्ग अवलंबताय. जो की अधोगतीकडे नेणारा आहे. आणि चुकीच्या मार्गाने जाऊन श्रीमंत व्हाल सुद्धा, पण ह्या सोबत अहंता पण चिकटून येतेत. ज्या मैत्रीमुळे किंवा ज्यांच्या संगतीमुळे तुम्हाला अहंकाराचा वारा शिवतो, अशी संगत, मैत्री काय कामाची? एकदा अहंकार निर्माण झाला की, मन शुद्ध राहत नाही. मी देही पणाचा भाव वाढीस लागतो. जो की मनाला समाधान, शांती देत नाही, तर असली संगत काय कामाची?

Palkhi Sohala : पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुढे समर्थ म्हणतात की, “तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम तोडी”. इतकं छान शब्दात समर्थ सांगताहेत की, एखाद्याच्या संगतीत जाऊन तुला समाधान, शांती मिळणार नाहीये. शांततेचा भंग होणार आहे. आपल्याला अहंकार चिकटायला येणार आहे. त्या संगतीच्या परिणामामुळे तसंच, ज्या संगतीमुळे आपण भगवंतापासून दूर जाणारा जात राहिलोत, त्या परमेश्वराला विसरत चाललो. ज्यामुळे अहंकार वाढीला लागून आपलं मन अशुद्ध होत गेलं. त्या मनाची निर्मळता नष्ट झाली तर, असं मन ईश्वराची भक्ती करणार नाही. ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे, तो परमेश्वराला शरण जाणार नाही. तर अशी संगत काय कामाची? ज्या संगतीने आपली बुद्धी रामनाम सोडेल.

त्या संगतीची काय गोडी धरावी? बरं त्या माणसांना असं वाटत असतं की, आपण व्रतवैकल्य, पोथीपुराण, दानधर्म, कीर्तन-प्रवचन या मार्गाने, वेळ मिळेल तेव्हा जाऊ. परंतु तुम्हाला संगत चांगली मिळाली नाही की, हे सगळं चांगलं योजलेलं, परत डोक्यातून निघून जातं. आणि माणूस भलत्याच मार्गाला जाऊन, आपली अधोगती करून घेतो. त्यामुळे आपण अशीच संगत धरली पाहिजे की, जेणेकरून आपल्याला राम नामाची गोडी लागेल. तुकाराम महाराजही, संत संगत धरा, हेच सांगतात.

संगत करो नी निर्मल संत री, म्हारी हेली
आवागमन मीट जाये रे, जन्म-मरण छूट जाय

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल नं.
7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.