Manoj Vajpeyi on Democracy: या देशातील लोकशाही कुठेही जाणार नाही…

काही लोकांना देशातील लोकशाही धोक्यात असल्याची भीती वाटतेय, या बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अभिनेता मनोज वायपेयी यांनी भीती वाटणाऱ्यांना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपटसृष्टीतील वेगळ्या वळणाचे चित्रपट देणारा अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी. रुढ हिंदी चित्रपटांपेक्षा त्याचे चित्रपट वेगळा संदेश देणारे असतात. तसेच मनोज भारंभार चित्रपटदेखील करत नाही. मोजकेच पण दर्जेदार चित्रपट हे त्याचे वैशिष्ट्य आहे. काही लोकांना देशातील लोकशाही धोक्यात असल्याची भीती वाटतेय, या बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अभिनेता मनोज वायपेयी यांनी भीती वाटणाऱ्यांना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.

‘ज्यांना भीती वाटते त्यांनी सरकारविरोधात निवडणुकीत उतरावं’, असं मनोज वाजपेयीनं म्हटलं आहे. आरफा खान शेरवानी यांनी अभिनेता मनोज वाजपेयीची अलीकडेच एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत मनोज वाजपेयीला देशातील लोकशाहीच्या भविष्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

‘भविष्यात देशात लोकशाही असेल की नाही, अशी शंका लोकांना वाटू लागली आहे?’ असा प्रश्न आरफा खानम शेरवानी विचारला. त्यावर मनोज म्हणाला, ‘मी तज्ज्ञ नाहीये. पण मला असं वाटत की या देशातील लोकशाही कुठेही जाणार नाही. मी खूप आशावादी आहे. मला कळत नाही, लोकांना भीती का वाटू लागली आहे. बघा प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका होतात. ज्यांना भीती वाटतेय, त्यांनी सरकार विरोधात निवडणुकीत उतरावं’, असं उत्तर वाजपेयीनं दिलं.

या मुलाखतीत मनोज वाजपेयीनं इतर विषयांवरही आपली मत मांडली. ‘राजकीय मुद्यांवर मतप्रदर्शन केल्यास कलाकारांना काम मिळणं कमी होत असं मला असं वाटत नाही’. चित्रपटांच्या माध्यमातून राजकारण केलं जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला,’ मी पद्मावत चित्रपट पाहिला. यात आपण जास्तच अभ्यास करायला लागलो नाही का? असा प्रश्न मला पडला. ‘मुघल ए आझमची’ कथा कोणत्याही प्रकारे खरी होती का? जो इतिहास आपण वाचला, त्यांच्याशी तिचा संबंध आहे का? तर त्या कथेचा इतिहासाशी संबंध नव्हता. मी ‘पद्मावत’ चित्रपट बघितला, त्यात मला कोणतीही आक्षेप वाटला नाही. मी ‘उरी’ चित्रपट बघत होतो. त्यातील एक दृश्य बघून मात्र मी रडलो’, असंही मनोज म्हणाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like