Maratha Reservation : आळंदीमध्ये आजपासून श्रीकांत काकडे यांचे बेमुदत उपोषण सुरू

एमपीसी न्यूज : सकल मराठा समाज आळंदी देवाची व आळंदी सर्कल यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या (Maratha Reservation) समर्थनार्थ 26 ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणास महाद्वार चौक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा समोर सुरुवात झाली आहे.  आळंदीतील सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि आंदोलन करणारे मराठा युवक श्रीकांत काकडे यांनी आज 30 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. तदपूर्वी त्यांनी सकाळी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. उपोषण स्थळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. व  छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व  मराठा आरक्षण मिळावे यासाठी आळंदीमध्ये साखळी उपोषण  व आमरण उपोषण सुरू आहे. आज हा साखळी उपोषणाचा पाचवा दिवस सुरु आहे.

Maratha Reservation : जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक; जरांगे पाटील यांनी व्यक्त केली शंका

आजच्या  साखळी उपोषणाचे उपोषणकर्ते रमेश तौर, मारुती सोळंके व रामदास सोळंके हे आहेत. तसेच आज सायंकाळीसुद्धा (Maratha Reservation) उपोषण स्थळासमोर वारकरी संस्थेच्या वतीने वारकरी विद्यार्थ्यांनी हरिपाठ सेवा सादर करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.