PCMC : महापालिकेकडून वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका

एमपीसी न्यूज – विद्यार्थी आणि शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव (PCMC) वाढविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी एक नाविन्यपूर्ण वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिकेचे अनावरण केले असून या दिनदर्शिकेमुळे शाळांमध्ये सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे. तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावरील कामाचा ताणही कमी होत आहे.

‘वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका’ ही महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी संपुर्ण वर्षभराचा आराखडा आहे.

महापालिका शाळांमध्ये एकसमानता वाढवण्यासाठी आणि क्रियाकलाप सुव्यवस्थित करण्यासाठी या दिनदर्शिकेचा वापर केला जात असून संपूर्ण शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविणाऱ्या क्रिडाविषयक, सांस्कृतिक तसेच वैविध्यपुर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासही या दिनदर्शिकेमुळे मदत होत आहे.

या दिनदर्शिकेबाबत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, दिनदर्शिकेमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे.

Maratha Reservation : आळंदीमध्ये आजपासून श्रीकांत काकडे यांचे बेमुदत उपोषण सुरू

तसेच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळांना आगामी उपक्रमांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असून शिक्षकांवरील (PCMC) कामाचे ओझे कमी होऊन शिक्षणाची एकूण गुणवत्ता वाढविण्यासही मदत होत आहे.

या दिनदर्शिकेची अंमलबजावणी करून महापालिका सर्व शाळांमध्ये एक सुसंगत आणि सातत्यपूर्ण रचनात्मक प्रणाली तयार करण्याचे नियोजन करत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सुसंवादी शैक्षणिक अनुभवाचा फायदा होईल.

दिनदर्शिकेमध्ये दप्तराविना शाळा, वार्षिक, सामाहिक परिक्षांचे वेळापत्रक, शालेय सुट्ट्या, स्पर्धा, शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रशिक्षण वेळापत्रक तसेच भारतीय गुणवत्ता परिषद मुल्यांकन वेळापत्रक अशा अनेक उपक्रमांचा समावेश केला गेला आहे.

या नावीन्यपुर्ण उपक्रमामुळे महापालिकेच्या शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी तसेच सार्वजनिक शाळांमध्ये शैक्षणिक नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक नवीन मानक स्थापित करण्यात उपयुक्त ठरत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.

दरम्यान, या महत्त्वपूर्ण उपक्रमाची संकल्पना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी फेब्रुवारीमध्ये मांडली होती आणि वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिकेचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक संवाद सत्राच्या वेळी झाले होते.

महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शालेय वार्षिक दिनदर्शिकेचे वितरण केले गेले असून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी नियोजनबद्ध शैक्षणिक प्रवासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

शिक्षक म्हणतात…! PCMC

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक शाळांनी वैयक्तिक तसेच शालेय स्तरावर नियोजन करून शैक्षणिक दिनदर्शिकेचे वितरण केले आहे.

या कार्यसंघातील मुख्य सदस्य म्हणून शाळेचे स्थान, सामाजिक संदर्भ आणि विद्यार्थी संख्या यांसारख्या बाबींचा विचार करून महत्त्वपूर्ण उपक्रमात योगदान देण्याचा विशेषाधिकार मला मिळाला याचा आनंद आहे.
– आनंदी जंगम, म्हेत्रेवाडी शाळा क्र.92

शैक्षणिक दिनदर्शिकेसाठी अगदी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये वर्षभरातील महत्त्वाच्या संकल्पना आणि सांस्कृतिक उत्सवांचा तसेच विविध महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

या दिनदर्शिकेत सर्व विषयांमधील विद्यार्थ्यांच्या आवडी चांगल्याप्रकारे दर्शविल्या गेल्या असून अचूकता आणि सर्वसमावेशक वेळापत्रकासाठी अनेक महत्वाच्या बाबींचा विचार करण्यात आला आहे.
– जयश्री भुजबळ, कासारवाडी मुले व मुलींची प्राथमिक शाळा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.