Maratha Reservation : जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक; जरांगे पाटील यांनी व्यक्त केली शंका

एमपीसी न्यूज : आज सकाळपासून बीड येथे मराठा आंदोलन (Maratha Reservation) पेटले आहे. आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगाव नगर परिषद आंदोलकांनी पेटवून दिली. यावर आता मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे, की जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक असल्याची शंका आहे. 

जरांगे पाटील म्हणाले, की मी समाजाला सांगितले होते, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण (Maratha Reservation) करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करतोय. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. पण, आंदोलन शांततेत सुरू असताना हे कोण करत आहे ही शंका येत आहे.

जाळपोळ करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याची शंका असून ते आपल्याच लोकांची जाणून बुजून घरे जाळत (Maratha Reservation) आहेत.

PCMC : घंटागाडी ठेकेदारांना दिवाळीपूर्वी विशेष बक्षिस; 293 ठेकेदारांना प्रत्येकी 30 हजार रुपये

या सोबतच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.