Pradeep Patwardhan : हसरा तारा निखळला; अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचे निधन

एमपीसी न्यूज : धक्क्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे निधन झाले आहे. त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी मराठी सिनेसृष्टीत अनेक नाटक, चित्रपट तसेच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवला होता. ‘मोरूची मावशी’ हे त्यांचे नाटक फार गाजले होते. त्यांच्या जाण्याने मराठी प्रेक्षक आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते गिरगाव येथे स्थायिक होते. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.