Dehuroad : लग्नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात मानपान न केल्यावरून तसेच लग्नात साहित्य न दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे वारंवार पैशाची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना म्हस्केवस्ती, रावेत येथे घडली.

पती गजानन पेंढारकर (वय 34), सासू मालन पेंढारकर (वय 50), सासरे रूक्‍माजी पेंढारकर (वय 60, सर्व रा. रावेत), ननंद सत्यभामा नवनाथ बोळकेकर (वय 38, रा. अहमदपूर, लातूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या माहेरच्या मंडळींनी लग्नात मानपान केला नाही. तसेच लग्नात साहित्य दिले नाही. यावरून आरोपींची त्यांचा  छळ केला. तसेच महिलेकडे वारंवार माहेरहून वीस लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या मंडळींनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत उपाशी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.