Pimpri : पोलीस कर्मचा-यांची उणीव स्वयंसेवक भरुन काढणार – मनीष कल्याणकर   

एमपीसी न्यूज – पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी आणि अलंकापुरी सज्ज झाली आहे. देहू – आळंदी पूर्वी पुणे ग्रामीण पोलीस अखत्यारीत येत होते. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे दोनही संतपीठ धामिर्क स्थळे ही आता शहर पोलीस ठाणे अंतर्गत आली आहेत. परंतु अपुऱ्या पोलीस कर्मचारी बळामुळे देहूरोड आणि आळंदी पोलीस ठाण्यास पालखी सोहळ्यास अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक, पोलीस मित्र आणि विशेष पोलीस अधिकारी यांची मदत पोलीस यंत्रणेला मिळणार आहे. वैष्णवांची सेवा व सुरक्षा मदत करण्याचे कार्य सदरचे स्वयंसेवक नक्कीच करतील, असे मत देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी पिंपरी येथे व्यक्त केली.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक, पोलीस मित्र आणि विशेष पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  बैठकीस एल आय बी चे पोलीस हवालदार अशोक नवले, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख  विजय मुनोत, महिला प्रमुख अर्चना घाळी, पालखी दक्षता विभाग प्रमुख संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, तेजस सापरिया,मावळ विभाग प्रमुख अंकुश घारे, समीर चिले, अमित डांगे, विशाल शेवाळे,संदिप सकपाळ, मंगेश घाग उपस्थित होते.

समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने वारकरी देहू आळंदी येथे येत असतात, दिंडीमध्ये शुद्ध पेय जल देण्याची खास व्यवस्था यंदाच्या वर्षी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक देशी वृक्षाची लागवड पालखीच्या मार्गावर करण्यात येणार आहे. या वर्षी समितीचे १५० स्वयंसेवक बंदोबस्त सेवेमध्ये सामील होणार आहेत. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन तसेच अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे  यांचे हस्ते “हरित वारी”  ची सुरुवात केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.