Marunji : लग्नात बेड व गादी दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ, विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्य़ा

एमपीसी न्यूज – लग्नात बेड व गादी दिली नाही शिवाय टेम्पो (Marunji ) खरेदीसाठी पैसे मागत सासरच्यांनी  विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केला. याच छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार मारुंजी येथे रविवारी (दि.21) घडला.

याप्रकऱणी मुलीचे वडील तुकाराम सुदाम केंद्रे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती राहूल सदाशीव कराड़, सासू व सासरे सदाशीव कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RBI News : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणं हा चलन व्यवस्थापनचा भाग – गव्हर्नर शक्तिकांत दास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादीच्या मुलीचा 7 मे 2019 रोजी आरोपीशी विवाह झाला होता. मात्र लग्नात गादी व बेड दिला नाही म्हणून पती व सासू, सासऱ्याने विवाहितेचा सतत शारीरिक व मानसीक छळ केला.

पुढे पतीला टेम्पो घ्यायचा आहे म्हणून माहेरून 1 लाख रुपये घेऊन ये म्हणत त्रास केला. या जाचाला कंटाळून फिर्यादीच्या मुलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Marunji ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.