Chakan News : चाकण पालिकेची भरमसाठ करवाढ

एमपीसी न्यूज : चाकण पालिकेने केलेल्या भरमसाठ करवाढीच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे व (Chakan News) त्यांच्या सहकार्यांनी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने वाढीव कर कमी होण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण नगरपरिषदेने केलेली कर आकारणी तसेच त्यात समाविष्ट केलेले इतर अनावश्यक कर कमी करून पुन्हा नव्याने कर आकारणी दर निश्चिती करून त्याप्रमाणे कर वसुली करण्यात यावी याबाबत सकारात्मक चर्चा करून शिवसेनेचे युवा नेते नितीन गोरे यांनी निवेदन दिले.

Chakan News : हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या वाहनांचे उद्घाटन

यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन बदल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. चाकण पालिकेने (Chakan News) शिक्षण कर मोठ्या प्रमाणार आकारला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.