Maval Corona Update : मावळात आज 121 नवे रुग्ण; 58 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.15) 121  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर तालुक्यात दिवसभरात 58  जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 250  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 1004  आहे.

शहरी भागात 92  तर ग्रामीण भागात 29  रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 28  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 59 रुग्ण तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 5  रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11,244झाली आहे. तर दिवसभरात 58  जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 11, इंदोरी 2, कुसगाव बुद्रुक 2, कान्हे 2 , करंज गाव 2, वडेश्वर 2 तर ब्राम्हणोली, चिखलसे, शिंदगाव, कोंडीवडे नामा, नाणे, सुदुंबरे, तळेगाव दाभाडे ग्रामीण, वाकसई येथे प्रत्येकी एक असे एकूण 29 रुग्ण सापडले.

आतापर्यंत 9990 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3654,लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2156 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 701 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6511रुग्ण तर ग्रामीण भागात 4733 रुग्ण आढळून आले आहेत. 4 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88.85 टक्के आहे तर मृत्यू दर 2.22 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 287 , लोणावळा नगरपरिषद मध्ये 238 , वडगाव नगरपंचायत मध्ये 49 व ग्रामीण भागात 439  असे एकूण 1004 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.