Maval Corona Update : तालुक्यात 127 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 59 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 7) 59 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 5 हजार 117 झाली आहे. तर दिवसभरात 127 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कुसगाव प मा (महिला, 62 वर्ष), वराळे (पुरुष, 91 वर्ष) येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 38 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 21 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 16, लोणावळा शहरात 22 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 5 हजार 117 रुग्णांमध्ये सध्या 542 रुग्ण सक्रीय आहेत. तर 4 हजार 400 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 537, लोणावळा नगरपरिषद 1 हजार 162 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 309 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 2 हजार 109 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

बुधवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण 5, टाकवे बु 4, वेहेरगाव 3, कामशेत 3, टाकवे खु 2, वराळे, कान्हे, कुसगाव प मा, आढले खु येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मावळातील 41 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 4 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 45 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.