Maval Corona Update: मावळ तालुक्यात शनिवारी 20 नवीन रुग्णांची नोंद; 19 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात काल (शनिवारी) कोरोनाचे 20 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 362 झाली आहे. तर दिवसभरात 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेले रुग्ण तळेगाव दाभाडे (पुरुष, 79 वर्ष), वराळे (पुरुष, 37 वर्ष) येथील आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 7 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 13 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 5, वराळे 3, कान्हे 2 आणि माऊ, कुसगाव बु., साते येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 3, लोणावळा शहरात 1 आणि वडगावमध्ये 3 रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 362 रुग्णांमध्ये सध्या 417 रुग्ण सक्रीय आहेत. तर 893 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 440, लोणावळा नगरपरिषद 146 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 101 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 675 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 412 आणि होम आयसोलेशनमध्ये 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.