Maval Corona Update : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 33 नवीन रुग्ण

दिवसभरात 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 1) कोरोनाचे 33 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 34 झाली आहे. तर दिवसभरात 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण तळेगाव स्टेशन (पुरुष, 60 वर्ष), सोमाटणे (पुरुष, 51 वर्ष) येथील आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 23 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 10 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत येथील चार, कुसगाव बु. येथील दोन, निगडे, कांब्रे नामा, नाणे, वेहेरगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 14, लोणावळा शहरात 8 आणि वडगावमध्ये एक रुग्ण आढळले आहेत.

एकूण 2 हजार 34 रुग्णांमध्ये सध्या 534 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 418 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 703, लोणावळा नगरपरिषद 255 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 133 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 943 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.