Maval Corona Update : तालुक्यात 76 नव्या कोरोना रुग्णांची वाढ तर 72 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.2) 76 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 72 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 816 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 26 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 33 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 02 रुग्ण सापडले.

सध्या रुग्णालयात 816 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9934 झाली आहे. तर दिवसभरात 72 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 61 रुग्ण तर ग्रामीण भागात 15 रुग्ण सापडले.

ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 06 वराळे 03, इंदोरी 03, कामशेत 02 कडधे 02 एकूण 16 रुग्ण सापडले. 8881 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3235, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1855 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 635 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5725 रुग्ण तर ग्रामीण भागात 4209 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.