Maval Corona Update : आज दिवसभरात 218 नवे रुग्ण तर 192 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 13) 218 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 192 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

आज पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत 332 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2257 आहे.

शहरी भागात 169 तर ग्रामीण भागात 49 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 122 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 35 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 16686 झाली आहे. तर दिवसभरात 192 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात उर्से 8, कामशेत 6, टाकवे बुद्रुक 5, सोमाटणे 5, साळुंब्रे 4, आंबी 3, इंदोरी 3, कुसगाव खुर्द 3, शिरगाव 2, वराळे 2, नवलाख उंब्रे 2, सुदुंबरे, दहिवली, गोवित्री, बेबड ओहळ, चिखलसे व परंदवडी प्रत्येकी 1 असे एकूण 49 रुग्ण सापडले.

14097 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5700, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3188 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 911 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 9799 रुग्ण तर ग्रामीण भागात 6887 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 84.48 टक्के आहे तर मृत्यू दर 1.99 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 811 लोणावळा नगरपरिषद मध्ये 398 वडगाव नगरपंचायत मध्ये 93 व ग्रामीण भागात 955 असे एकूण 2257 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.