Maval : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला – बाळा भेगडे

मावळच्या गावागावातून महायुतीला मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार; मावळ परिसरात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशहिताचे निर्णय घेतले असून त्यातून देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. केंद्र स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. उज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅस पोहोचवून महिलांना सन्मान मिळवून दिला. आयुष्यमान भारत योजना, जनधन योजना, किसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबवल्या आहेत. असे मत मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केले.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचार दौरा केला. प्रचार दौ-यात त्यांनी गावोगावी भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली. प्रचार दौ-यादरम्यान प्रत्येक गावातील गावक-यांनी महायुतीला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. महायुतीच्या प्रचार दौ-यात मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार रुपलेखा ढोरे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, तालुका प्रमुख राजू खांडभोर, सरपंच उकसाण ताईबाई आखाडे, उपसरपंच जनाबाई शिंदे, सुरेश गायकवाड, गणेश भेगडे, मधुकर पोटफोडे, प्रशांत ढोरे, रवी शेलार, संदीप काकडे, गणेश गायकवाड, विजय टाकवे, रवी आंद्रे, शिवाजी टाकवे, बबनराव तडस, गणेश कुंभार, संभाजी येवले, ललिता राणे, जिजाबाई कुंभार, कामशेत माजी सरपंच माऊली शिंदे, संतोष भेगडे, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब ठाकर आदी उपस्थित होते.

  • नाणे, कांब्रे, कोंडीवडे, करंजगाव, गोवित्री, उकसाण, जांभवली, कोंढेश्वर, वळवंती, उंबरवाडी, खांडशी, नेसावे, सांगिसे, भाजगाव, शिरदे, सोमवाडी, थोरण, वळक, बुधवडी, वडीवळे, पाथरगाव, पिंपळोली, ताजे, बोरज, पाटण, मळवली, भाजे, देवले, औंढे, औंढोली, कुसगाव बुद्रुक, ओकळाईवाडी, डोंगरगाव, कुरवंडे आदी गावांना खासदार बारणे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. ‘महायुतीचा विजय असो’, ‘श्रीरंग बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आपली निशाणी, धनुष्यबाण’ अशा घोषणांच्या निनादात मावळ परिसरातील सुमारे 40 गावांना भेटी दिल्या.

आमदार बाळा भेगडे म्हणाले, “मावळ भागात रस्ते, वीज, पूल आणि विविध विकासकामे झाली आहेत. उकसाण सारख्या ग्रामीण भागाचा विकास करून त्याला मावळ तालुक्यातील मिनी काश्मीर अशी ओळख निर्माण करून दिली. विरोधकांनी मात्र इथला शेतकरी पाण्यासाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात तीन शेतक-यांना हौतात्म्य आले. त्याचे उत्तर आता राष्ट्रवादी काँग्रेसला मतपेटीतून द्यायचं आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “केवळ टीकात्मक बोलून विरोधकांकडून प्रचार केला जात आहे. कारण विरोधकांकडे बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही. विकासकामाचे नियोजन नाही. त्यांनी त्यांच्या काळात कोणत्याही योजना राबवल्या नाहीत. महायुतीने मागील पाच वर्षांच्या कालावधीत विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन काम केलं आहे. अनेक योजना राबवून त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. विकासाचा आलेख चढता ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत यायला हवे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.