Rahatani : संगणक अभियंत्याची बाराव्या मजल्यावरील गच्चीवरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज- बाराव्या मजल्यावरील गच्चीवरून उडी मारून एका संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. आज, गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेबाराच्या सुमारास रहाटणीतील रॉयल ग्रीन फेज 1 सोसायटीमध्ये ही घटना घडली.

रोहित बापूराव पाटील (वय 28, रा. रहाटणी, मुळगाव धुळे) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. तो हिंजवडी येथील एका कंपनीत कामाला होता.

रोहित हा इलेक्ट्रिक इंजिनिअर असून रहाटणी येथे भावासोबत राहतो. गुरुवारी दुपारी रोहितचा भाऊ कामाला गेला होता तर त्याची वाहिनी घरात होती. दरम्यान तो घरातून इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील गच्चीवर आला. तेथून खाली उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले होते त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.