Maval Fire : एकविरा देवी गडाच्या पायथ्याशी दुकानांना आग

एमपीसी न्यूज – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरा देवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुकानांना आग (Maval Fire) लागली. ही घटना सोमवारी (दि. 1) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेहेरगाव येथे सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक दुकानांना आग (Maval Fire) लागली. काही वेळेत आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या घटनेबाबत तात्काळ अग्निशमन विभागात माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

Maharashtra News : शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना दुखापत

दुकानांमध्ये गॅस सिलेंडर असल्याने आगीचा भडका उडाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.