Today’s Horoscope 1 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – वार – सोमवार. 1 मे 2023 (Today’s Horoscope 1 May 2023)

शुभाशुभ विचार – 9 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – महाराष्ट्र दिन, मोहिनी एकादशी.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00

दिशा शूल – पूर्वेस असेल.  आजचे नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 17.51 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————————-

मेष – (शुभ रंग- आकाशी)

आज काम कमी व दगदगच जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा फक्त वादास कारणीभूत होईल. प्रेम प्रकरणे फुलतील, बहरतील.

वृषभ (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या वाढत्या मागण्या आज आनंदाने पुरवाल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल.

मिथुन (शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) (Today’s Horoscope 1 May 2023)

आवक पुरेशी असली तरीही आज तुम्ही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.  क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून आपला स्वार्थ कसा साधता येईल तेवढे बघा.

Maharashtra News : शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना दुखापत

सिंह (शुभ रंग- मरून)

आज तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. क्षुल्लक गोष्टी फारच तुम्ही मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींना दोन हात दुरुच ठेवा.

कन्या (शुभ रंग- क्रीम)

आज पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. थोडी भटकंती होईल  अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन व वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा) (Today’s Horoscope 1 May 2023)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदबीने वागतील. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.

Pimpri : ‘लव्ह जिहाद’ हा तर हिंदु अन् ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी हल्ला – प्रशांत संबरगी

धनु- (शुभ रंग- राखाडी)

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत आज वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकतो  आज कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

मकर ( शुभ रंग- भगवा)

विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

कुंभ (शुभ रंग – पिस्ता)

आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बाळा. उंची वस्त्र खरेदी कराल आपल्या जोडीदारासही एकादे सरप्राईज गिफ्ट द्याल महत्त्वाच्या चर्चेत आपली मते प्रभावीपणे मांडाल.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी )

आज दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होणार आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण असावे. काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. आज खेळाडू स्पर्धा जिंकू शकतील.

शुभम भवतु.

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क  – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.