Maval : बाबाराजे देशमुख यांना विविध संघटनांचा पाठिंबा

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघातील मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवार बाबाराजे देशमुख यांना मिळत असणाऱ्या विविध संघटनाचा वाढता पाठिंबा लक्षात घेता या मतदारसंघात बाबाराजे देशमुख यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.

शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच पीडित लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणून बाबाराजे देशमुख यांची ओळख आहे. मावळ मतदारसंघामध्ये आपल्या हक्काचा खासदार निवडून यावा या करिता बाबाराजे देशमुख यांना विजयी करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना काम करीत आहेत. समाज संजीवनी संस्था महाराष्ट्राचे अध्यक्ष सुयश शिर्के, मराठा मावळ संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष केशव झंझे, कोकण विभाग प्रवक्ता राहुल कव्हळे यांची साथ बाबाराजे देशमुख यांना लाभली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र मराठा संघर्ष सेना, क्षत्रिय मराठा सातवाहन प्रतिष्ठान, मावळ मराठा, मराठा क्रांती आंदोलन समिती या संघटनांच्या वतीने बाबाराजे देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.