Colombo : श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटात 130 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- ईस्टर संडे साजरा होत असताना आज श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. साखळी बाॅम्बहल्ल्यात आतापर्यंत 130 जणांचा जीव गेल्याची माहिती मिळत असून 450 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. यात विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे. ही घटना आज, रविवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याचा सुमाराला घडली. एकूण सहा स्फोट झाले.

कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्छिकाडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले. तर किंग्ज बेरी, शांग्रिला आणि सिनामोन अशी स्फोट झालेल्या हॉटेल्सची नावे आहेत. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. या घटनेने श्रीलंकेमध्ये खळबळ माजली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.