Pimpri : विद्यानगर, परशुरामनगरमध्ये आमदार गौतम चाबुकस्वार यांची प्रचारफेरी

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी शनिवारी( दि. 20) सायंकाळी विद्यानगर भागात प्रचार फेरी काढली.

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका जयश्री वाघमारे, राम पात्रे, नितीन घोलप, विभाग प्रमुख अनिल पारचा, अशोक गायकवाड सहभागी झाले होते. या आमदार चाबुकस्वार यांनी विद्यानगर भागात घरोघरी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार केला. तब्बल चार तास फिरून हा भाग पिंजून काढला.

दलित, अल्पसंख्याक तसेच ओबीसी व भटक्या विमुक्त वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या परशुरामनगर परिसरात शनिवारी (दि. 19) आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी घरोघरी जाऊन प्रचार करत नागरिकांना शिवसेना उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ परशुरामनगर भागात आज प्रचारफेरी काढण्यात आली. माजी नगरसेवक राम पात्रे, विभाग प्रमुख अनिल पारचा, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, डाॅ जयदीप भालशंकर आदींसह सेनेचे सुमारे 30 कार्यकर्ते सहभागी झाले होते.

म्हाडा काॅलनी, मोरवाडी येथे आमदार चाबुकस्वार यांनी साधला मतदारांशी संपर्क

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज, रविवारी(दि. 21) सकाळी आमदारांच्या नेतृत्वाखाली म्हाडा काॅलनी व मोरवाडी येथे नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या.

माजी नगरसेवक संजय साळवी, शिरीष मोरे, ज्ञानेश्वर सोसायटीचे अध्यक्ष निळकंठ शिंदे तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी आमदारांसमवेत होते.
प्रचार पत्रक व अहवालाचे वाटप करीत आमदारांनी शिवसेनेसाठी बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आमदारांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.