Maval News : मावळातील शाळेच्या दहावी मार्च 89 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी एक लाख 33 हजार 891 रूपयाचा धनादेश

एमपीसी न्यूज – इंदोरी मावळ येथील प्रगती विद्यामंदिर व ह.भ.प.आनंदराव नारायण काशिद पाटील ज्युनियर काॅलेजच्या एस. एस.सी. बॅच मार्च 89 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी एक लाख 33 हजार 891 रूपयाचा धनादेश प्राचार्या प्रिती जंगले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर भेगडे होते. प्रमुख पाहुणे सभापती ज्योती शिंदे, तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लब अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, तळेगाव सिटी रोटरी क्लबचे संस्थापक विलास काळोखे, उपसरपंच योगेश शिंदे, शालेय समिती पालक सुरेश शहा, शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, माजी सरपंच संदीप काशिद, पांडुरंग पोटे, प्राचार्या प्रिती जंगले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विलासराव काळोखे यांनी 21000 रूपये व सुरेश शेंडे यांनी 5000 रुपये देणगी दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय चव्हाण, विजय दर्शले, अजित शिंदे, संजय शिंदे, दत्ता घोजगे, देविदास पवार, सुदाम ढोरे, रामदास शिंदे, गणेश दगडे, नागेश भागवत, नवनाथ वाळुंज, उज्ज्वला काशीद सुवर्णा शिंदे, वैशाली दाभाडे, सुनीता चव्हाण, वसुधा भसे, कुंदा घुले, सुनिता शेवकर, सुरेखा शिंदे, शबाना सय्यद, सुवर्णा पिंजण, मंदाकिनी पिंजण यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रास्ताविक लक्ष्मण मखर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश शिंदे व शबाना सय्यद यांनी केले. आभार अंजली दौंडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.