Maval News: अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुकाध्यक्षपदी दत्ता शिंदे

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका कार्यकारिणीचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा शांताई मंगल कार्यालयात शिवव्याख्याते रोहिदास महाराज हांडे, हभप महावीर महाराज सूर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, हवेली तालुका अध्यक्ष संतोष महाराज काळोखे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय नियमांच्या आधीन राहून नुकताच झाला.

देश,धर्म, संस्कृतीचे पालन करण्यासाठी आणि संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी, गोसंरक्षण, व्यसनमुक्ती, सार्वजनिक स्वच्छता अशा प्रकारचे विधायक उपक्रम राबविण्यासाठी वारकरी बांधवांनी संघटीत होण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी निवडलेल्या कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे, उपाध्यक्ष गोपीचंद कचरे, कोषाध्यक्ष तुकाराम भांगरे, प्रसिद्धी प्रमुख सचिन ठाकर, सचिव गणेश जांभळे आदींसह संतोष कुंभार, दत्तोबा भोते यांची निवड करण्यात आली.

यावेळी नऊ समित्या स्थापन करून त्यांचे प्रमुख, उपप्रमुख, सचिव निवडण्यात आले.

वारकरी शिक्षण समिती- संजय कालेकर, रामदास मोरे, दिनकर निंबळे.

 व्यसनमुक्ती समिती- लक्ष्मण तळावडे, लक्ष्मण पारखी, नंदा जाधव.

 सार्वजनिक मंदिर समिती – मुकुंद खांडभोर, शंकर बोंबले, मारुती वावरे.

सप्ताह व दिंडी समिती – सोपान येनपुरे, रामदास घुडे, नंदा धनवे.

 समाजकल्याण समिती – राजाराम असवले, लक्ष्मण काळे, नारायण केंडे.

 महिला बालसंस्कार समिती – अनुसया म्हस्के, छाया काकरे, संगीता फाळके.

युवा समिती – दत्तात्रय गरुड, राजू क्षीरसागर, युवराज पवळे.

 आरोग्य समिती – डॉ. विकेश मुथा, आत्माराम शिंदे, तानाजी गुणाट.

गोपालन समिती – जनार्दन ठाकर, शांताराम जगताप,सुरेश बिनगुडे

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी कांतीलाल रसाळ, भाऊसाहेब कालेकर, गबळू घारे, सरपंच खंडू कालेकर, शैलाताई कालेकर, सुनील वरघडे, लक्ष्मण ठाकर आदींसह नाणे मावळ, आंदर मावळ, पवन मावळातील वारकरी हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.