Maval News: कासाबाई मारुतराव गाडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – सुदुंबरे येथील कासाबाई मारुतराव गाडे (वय 87) यांचे सोमवारी (दि.30) वृद्धापकाळाने निधन झाले.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिवंगत माजी सभापती मारुतराव महादू गाडे यांच्या त्या पत्नी आणि सुदुंबरे गावचे माजी सरपंच माणिक मारुतराव गाडे यांच्या मातोश्री होत.

त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन विवाहित मुली, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

कै. कासाबाई गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन आधुनिक पद्धतीने शेती करण्यात आली. प्रगतीशील शेतकरी विठ्ठलराव गाडे, कुंडलिक गाडे यांच्या त्या चुलती तर डेप्युटी इंजिनियर सचिन गाडे, मयूर गाडे यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.