-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval News : कुसगावच्या पोलीस पाटील नेमणुकीसाठी ग्रामस्थांचे विभागीय आयुक्तांना निवेदन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगाव या गावचे पोलीस पाटील पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी बेकायदेशीर ठरवल्याने निवड यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला पोलीस पाटील पदावर नियुक्ती द्यावी, अशी मागणी कुसगाव ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली.

याबाबत ग्रामस्थांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले आहे. सन 2017 साली घेण्यात आलेल्या पोलीस पाटीलपदाच्या परीक्षेत कुसगाव या गावासाठी आलेल्या निवड यादीत श्री. सोनार यांची प्रथम स्थानी निवड झाली. मात्र त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी ही नियुक्ती रद्द केली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

त्यानंतर कुसगावचे पोलीस पाटील पद रिक्त आहे. नियमानुसार पोलीस पाटील पदावरील पहिल्या उमेदवाराची निवड रद्द झाल्यास त्यानंतरच्या क्रमांकाच्या उमेदवाराला नियुक्ती देणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात असे झाले नाही. प्रशासनाने या प्रकरणात कमालीची दिरंगाई केली. निवड यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले किसन महादू गुंड यांची निवड करण्यासाठी ग्रामस्थांचा देखील होकार असून गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अन्य पदाधिकारी आणि नागरिक यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.

महिनाभरात किसन महादू गुंड यांची कुसगावचे पोलीस पाटील म्हणून नेमणूक करावी; अन्यथा ग्रामस्थ माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कुसगावच्या पोलीस पाटील पदावर नेमणूक करण्याच्या मागणीसाठी प्रदीप नाईक यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देखील साकडे घातले आहे. गेली दोन वर्षे सातत्याने हा प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांच्या दफ्तर दिरंगाईमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचे नाईक यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.