Maval: विद्युत रोहित्रातून अडीचशे किलो तांब्याच्या कॉइल चोरीला

एमपीसी न्यूज – विद्युत रोहित्रातून 250 किलो वजनाच्या तांब्याच्या कॉइल (Maval)चोरीला गेल्या. ही घटना शनिवारी (दि. 16) मध्यरात्री मावळ तालुक्यातील आंबी गावात घडली.
ओम शरद मस्के (वय 22, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी (Maval)पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune RTO : दुचाकीसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरु होतेय; दुचाकीचा मनपसंत क्रमांक चारचाकीसाठी राखून ठेवण्याची संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आंबी येथे मास्क फूड अँड बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. कंपनीच्या आवारात असलेल्या विद्युत रोहित्रातून अज्ञात व्यक्तीने 250 किलो वजनाच्या तांबे धातूच्या कॉइल चोरून नेल्या. तसेच रोहित्रातून 100 लिटर ऑइल सांडवून त्याचे नुकसान केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.