Maval : रोटरी क्लब ऑफ प्रिस्तीनचा ‘परिवर्तन पुरस्कार 2023’ दिशा संस्थेला प्रदान

एमपीसी न्यूज : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात (Maval) तळेगाव येथे मायमर कॉलेजच्या रिक्रीशन हॉलमध्ये हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ प्रिस्तीन यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला दिशा संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडीअर रघुनाथ जठार, विश्वस्थ इंदू गुप्ता, सदस्य ज्योती गोखले आणि दिशाचे लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमख पाहुणे रोटेरिअन अनिल परमार उपस्थित होते .

रोटरी क्लब ऑफ प्रिस्तीन यांचा प्रतिष्ठीत मानला जाणारा ‘परिवर्तन पुरस्कार 2023’ सामाजिक विकासांतर्गत महिला सक्षमीकरण, ग्राम विकासासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल मावळात कार्यरत असलेल्या दिशा संस्थेला मिळाला. रोटेरिअन सुदिन आपटे यांनी पुरस्काराची व्याख्या स्पष्ट केली व नंतर मानपत्राचे वाचन करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘परिवर्तन पुरस्कार 2023’ प्रदान करण्यात आला. दिशा संस्थेच्या वतीने हा पुरस्कार अध्यक्ष ब्रिगे. रघुनाथ जठार व विश्वस्थ इंदू गुप्ता यांनी स्वीकारला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व दिशा संस्थेचे अध्यक्ष यांनी आपले (Maval) अनुभव व दिशा बद्दलची माहिती सर्वाना दिली. हा पुरस्कार मिळणे हा दिशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे दिशा संस्थेचे अध्यक्ष ब्रिगे. रघुनाथ जठार यांनी सांगितले.

Satara : देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.