Satara : देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन

उपमुख्यमंत्र्यांनी केले माऊलींच्या पालखीचे सारथ्य

एमपीसी न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बरड ता.फलटण येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे (Satara) दर्शन घेतले आणि माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले.

यावेळी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते.

हरी नामाच्या गजरात आणि लाखो भाविक वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी मजल दर मजल करत आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ आहे. माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यातील बरड येथे मुक्काम असून उद्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.

Bhosari MIDC : डीपी रोडमधील बाधित 92 व्यावसायीकांना चऱ्होलीत 10 एकर जागा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.