Bhosari MIDC : डीपी रोडमधील बाधित 92 व्यावसायीकांना चऱ्होलीत 10 एकर जागा

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी भागातील (Bhosari MIDC) डीपी रोडवरील बाधित 92 व्यावसायीकांना चऱ्होली गावात 10 एकर जागा देण्यात येणार आहे. हे व्यावसायीक उद्यापासूनच स्थलांतरण करु शकतात, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मंत्री सांमत म्हणाले, विकास आराखड्यामध्ये रोड गेल्याने एमआयडीसी भागातील 92 व्यावसायिकांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हे व्यावसायिक अनेक बेरोजगारांना रोजगार देत आहेत. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यांच्यासाठी चऱ्होली परिसरात 10 एकर जागा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या व्यावसायिकांना उद्यापासूनही व्यवसाय स्थलांतर करता येऊ शकते.

व्यावसायिकांना किती जागा द्यायची हे असोसिएशन ठरविणार आहे. त्यानुसार (Bhosari MIDC) जागा ताब्यात देण्याचा बोर्डाचा ठराव चार दिवसात होईल. मात्र, ठरावासाठी व्यावसायिकांना थांबण्याची आवश्‍यकता नाही. एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे बांधून देण्यात येणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

Pune : ‘सीडॅक’च्या सहकार्याने भारती अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.