Maval : पुना सिम्स कामगार प्रतिनिधी निवडणुकीत शांताराम कराळे पाटील विजयी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील पुना सिम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ( Maval ) कामगार प्रतिनिधीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सुदवडी गावचे आदर्श व्यक्तिमत्व,सामाजिक कार्यकर्ते शांताराम किसनराव कराळे पाटील हे भरघोस मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे विश्वस्त म्हणून देखील ते काम करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचे विश्वस्त श्री गजानन(बापू) शेलार, रामभाऊ कराळे पाटील, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे, एमपीसी न्यूजचे मावळ विभागाचे पत्रकार प्रभाकर तुमकर आणि इतर विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन; मराठा आरक्षण आणि अधिवेशनाविषयी महत्वाचे मुद्दे

शांताराम कराळे पाटील यांचा पंचक्रोशीत आदर्श कामगार प्रतिनिधी, आदर्श व्यावसायिक,आदर्श ग्रामस्थ असा नावलौकिक आहे. ते ज्या क्षेत्रात असतात त्या क्षेत्रातील पदाला योग्य न्याय देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा विकास, कामगारांचे प्रश्न तसेच भंडारा डोंगराच्या विकासाच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन प्रश्न मार्गी लावण्याचे काम ते करतात. मित्रपरिवार नातेवाईक सर्वांशी आदराने राहणारे कराळे पाटील पंचक्रोशीतील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले ( Maval ) जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.