PCMC : महापालिकेचा 8 हजार 676 कोटी अर्थसंकल्प सादर

एमपीसी न्यूज – ‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2024-25- या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार  841 कोटी 96  लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत ( PCMC ) योजनांसह 8  हजार 676 कोटी 80 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज (मंगळवारी) सादर झाला. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आलेली नाही.

Maval : पुना सिम्स कामगार प्रतिनिधी निवडणुकीत शांताराम कराळे पाटील विजयी

विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला. प्रशासकांनी अर्थसंकल्पाला  तात्काळ मान्यता दिली. महापालिकेचा हा 42 वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त सिंह यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप  उपस्थित ( PCMC ) होते.

अर्थसंकल्पात काय आहे?

  • महापालिकेच्या विकास कामासाठी 1863 कोटी तरतूद
  • आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी 190 कोटी
  • स्थापत्य विशेष योजनांसाठी 1031 कोटी
  • शहरी गरिबांसाठी 1898 कोटी
  • महिलांच्या विविध योजनांसाठी 61 कोटी
  • दिव्यांग कल्याकणारी योजना 65 कोटी
  • पाणीपुरवठा 269 कोटी
  • भूसंपादनाकरिता 100 कोटी रुपयांची तरतूद आहे
  • अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेसाठी 10 कोटी
  • अमृत 2 योजनेसाठी 30 कोटी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.