Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन; मराठा आरक्षण आणि अधिवेशनाविषयी महत्वाचे मुद्दे

एमपीसी न्यूज – राज्यविधी मंडळाचे विशेष अधिवेशन आज मंगळवारी दिनांक 20 बोलाविण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता ( Maratha Reservation)  मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मागासवर्ग आयोगाने बनवलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली तसेच या अहवालाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

सकाळी अकरा वाजता राज्यपालांचे भाषण होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन दुपारी एक वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे –

अधिवेशनात कोणाला बोलू देणार

मराठा आरक्षणासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात फक्त गटनेत्यांना बोलू देणार असल्याचे समोर आले. मात्र अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर होत असते. त्यामुळे ज्या सदस्यांना बोलण्याची इच्छा आहे, त्या सर्वांना बोलू द्यावे, अशा प्रकारचा नियम असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

‘सगेसोयरे’चं काय होणार

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली जात ( Maratha Reservation) आहे. त्यासह ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगेसोयरे या अंतर्गत आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाने मागणी केली आहे. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देत असताना सगेसोयरे याचे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Pimpri : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्यावतीने शिवजयंती साजरी

मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण

मराठा समाजाला दहा ते तेरा टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे म्हटले जाते मागासवर्ग आयोगाच्या अहवालात 27% मराठा समाज असल्याचे समोर आले आहे समाजाच्या टक्केवारीच्या 50% आरक्षण द्यावे असे कायद्यात तरतूद आहे त्यानुसार मराठा समाजाला दहा ते 13 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे

आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा

आरक्षणाची मर्यादा 50 टक्के आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास केंद्रात कायदा करावा लागतो. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण दिल्यास ही मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयीन लढ्यात अडकण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकार हे टिकणारे आरक्षण कसे देणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे

मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार. हे आरक्षण देत असताना ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार देत आहेत. त्यामुळे आजच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे काय होणार हे पाहणे ( Maratha Reservation) महत्त्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.