Pimpri : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्यावतीने शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज – अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती ( Pimpri) निमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने नेहरूनगर, पिंपरी येथील न्यायालयात भव्य शिवजयंती उत्सव सोमवार (दि.19) साजरा करण्यात आला.

यावेळी ॲड. दिनकर बारणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तसेच पिंपरी – चिंचवड न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. गिरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सुभाष चिंचवडे, माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. सतीश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. मदनलाल छाजेड, ॲड. सचिन थोपटे, ॲड. किरण पवार, ॲड. सुदाम साने, ॲड. गोरखनाथ झोळ, तसेच माजी उपाध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. राजरत्न जाधव, ॲड. नितीन क्षीरसागर, ॲड. गोरक्ष लोखंडे,

ॲड. प्रसन्न लोखंडे, ॲड. सारिका परदेशी, ॲड. सुजाता बीडकर, ॲड. सारिका भोसले, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. विवेक राऊत, ॲड. मानसी उदासी, ॲड. आकाश फुरडे, ॲड. सनी काटे, ॲड. रिना मगदुम , ॲड. विद्यालता कमलेकर, ॲड. नीलेश टिळेकर, ॲड. प्रतीक्षा जाधव, ॲड. बालाजी देशमुख, ॲड. अनिल पवार, ॲड. शुभम खैरनार, ॲड. संकेत गराडे, ॲड. अक्षय गादेकर, ॲड. पूजा बदे, ॲड. अजिंक्य लोमटे, ॲड. आसावरी फडके यांची उपस्थिती होती.

शिवजयंती निमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी संस्कृती संवर्धन संस्थेच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळ, रणरागिणी युद्ध कला प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले; तसेच चित्रकला ( Pimpri) स्पर्धाही घेण्यात आली.

Pune : पुण्याचा पारा 35 अशांवर, तर उत्तर भरतात बर्फ वृष्टी

त्यानंतर वकील बार रूम येथे शिवव्याख्याते ह.भ.प. अशोकमहाराज पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील व्याख्यान झाले. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत चालता चालता छत्रपती शिवाजी महाराजांची विविध सुबक चित्र रेखाटली. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले आणि कार्यकारिणी यांनी केले होते. कमिटीचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले,

उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड.धनंजय कोकणे,ॲड. सहसचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, खजिनदार ॲड. अजित खराडे, हिशेब तपासणीस ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड.अस्मिता पिंगळे, ॲड. दशरथ बावकर, ॲड. मीनल दर्शिले, ॲड. फारुख शेख यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी केले.तर ॲड. अय्याज शेख यांनी आभार ( Pimpri)  मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.