Pune : पुण्याचा पारा 35 अशांवर, तर उत्तर भरतात बर्फ वृष्टी

एमपीसी न्यूज – पुण्यासह राज्यातील अनेक भागात पारा हा 30 च्या पार गेला आहे. त्यामुळे( Pune) उन्हाळ्याची चाहूल लागत असून दुपारी चांगलाच उन्हाचा कडाका जाणवत आहे. तर दुसरीकडे उत्तर भरतात मात्र बर्फ वृष्टी सुरु आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडीचा लाट येणार का अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. या संमिश्र हवामानमुळे साथीचे आजारांमध्ये दिवसें-दिवस वाढ होताना दिसत आहे.

राज्यात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीनचे तापमान सरासरी 34  अंश सेल्सिअसवर गेले आहे. किमान तापमानही सरासरी 20 अंश सेल्सिअवर आले आहे. उत्तर भारतात सध्या प्रचंड बर्फवृष्टी, गारपीट आणि पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम पुढील दोन-तीन दिवसांनंतर राज्यात दिसू शकतो. महिनाअखेरीपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे, यांनी दिली.

Pune : शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 56 जणांचे रक्तदान

शहर आणि परिसरातून थंडीने माघार घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवर आहे. किमान तापमान ही सरासरी 15 अंश सेल्सिअसवर आहे. सोमवारी मगरपट्ट्यात सर्वाधिक 21 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सोमवारी कमाल तापमान सरासरी 35 अंश सेल्सिअस होते. शिवाजीनगरमध्ये 35.3 , पाषाण मध्ये 34.4 , लोहगावात 34.9, चिंचवडमध्ये 35.2  लवळेत 37.5 आणि मगर पट्ट्यात 35.5  कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीसह किमान तापमानातही मोठी वाढ झाली आहे.

शिवाजीनगरमध्ये 14.7, पाषाणमध्ये 15.4 लोहगावत 17.1, चिंचवडमध्ये 19.6 आणि मगरपट्ट्यात 21  अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पहाटे काहीकाळ थंड वारे वाहत आहेत. पण, सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.