Pune : शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 56 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – मैत्री वेलफेअर फाऊंडेशन आणि रौद्रशंभो प्रतिष्ठान यांच्या ( Pune ) संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिवशंभो नगर, गल्ली क्र 3, कात्रज कोंढवा रोड येथे रविवारी (दि. 18) झालेल्या शिबिरात 160 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर 56 जणांनी रक्तदान केले.
डाॅ.अश्विनी भोंडवे-तिकोने,डाॅ. कल्पना भुंबरे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात160 नागरिकांची तपासणी करून होमिओपॅथिक औषधे माफक दरात वाटप करण्यात आली. 56 जणांनी रक्तदान केले.
यावेळी व्याख्याते चंद्रशेखर शिंदे यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तरूणांना शिवाजी राजांचा इतिहास सांगून रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले. रक्तदान शिबिरास पुना सिरोलाॅजिकल  ब्लड बँक, रास्ता पेठ पुणे यांचे विशेष सहकार्य ( Pune ) लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.