Pune : पुण्याला बसतोय ड्रग्जचा विळखा; विश्रांतवाडी भागातून 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्ज केले जप्त

मिठाच्या पॅकमध्ये केली जात होती विक्री

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी   100 कोटी रुपयांपेक्षा अधिक ( Pune)  किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे  पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन  मिळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेने छापा टाकून ही कारवाई केली आहे.

संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकमध्ये या पावडरची विक्री केली जात होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय 35 वर्ष, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

PCMC : महापालिका आयुक्तांना नोटीस

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांवर थेट कारवाईचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने शहरातील विश्रांतवाडी भागात छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एमडी) मिळून आले. तब्बल साडेतीन कोटींचे एमडी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीठ विक्रीच्या आडून हे रॅकेट सुरू होते. तसेच आरोपींच्या मागावर गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत.

या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता. कारण पुण्यात सापडलेल्या ड्रग्जची विक्री देशातील विविध भागात तसचं परदेशात होणार होती. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्ज पेडलरकडे ही विक्री होणार होती .पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही ( Pune) परदेशी नागरिक आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.