PCMC : महापालिका आयुक्तांना नोटीस

एमपीसी न्यूज – प्रलंबित वारसा नोकरीप्रकरण, अनुसूचित जातीच्या ( PCMC) कर्मचा-यांच्या रखडलेल्या बढत्या, मनुष्यबळाचा वापर करून नालेसफाई करणे, नालेसफाई करताना मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी कामागारांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन, तक्रार निवारण समितीची स्थापना, इत्यादी तक्रार निवारण करण्याकामी होणारी दिरंगाई या प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने विभागीय आयुक्त आणि पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. 15 दिवसात उत्तर देण्याचे आदेश नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत.

महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, पिंपरी – चिंचवड महापालिकेमध्ये ब-याच वर्षापासुन वारसा नियुक्तीची प्रकरणे, महापालिका प्रशासन दिशाभूल करत वारसांना नोकरी हक्कापासून वंचित ठेवत आहेत. कर्मचा-यांच्या बढत्यांमध्येही दफ्तरदिरंगाई केली जात आहे.

Maval : ठाकर समाजातील 90 जणांना घरपोच मिळाले जात प्रमाणपत्र

भारत डावकर या दिवंगत कामगारांच्या कुटुंबियांना महापालिकेकडून मोफत घर, नोकरी, कुटुंबियांचे पुनर्वसन, मुलांना मोफत शिक्षण देण्याकामी हलगर्जीपणा केला जात आहे. महापालिका प्रशासन दिशाभूल करत वारसांना नोकरी हक्कापासून वंचित ठेवत आहेत. त्याची दखल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेत विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना नोटीस बजावली ( PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.