Pune : प्रेयसीवर पाळत ठेवण्यासाठी प्रेयसीच्या दुचाकीला लावला जीपीएस

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला जीपीएस ( Pune ) यंत्र लावून तिचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बारामतीतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

लखन महादेव भिसे (वय 25 रा. पिंपळीता. बारामतीजि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शुक्रवार (दि.15) पेठेतील एका सोसायटीत राहायला आहे.

 

Pune : पुण्याचा पारा 35 अशांवर, तर उत्तर भरतात बर्फ वृष्टी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भिसे तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या नकळत दुचाकीला जीपीएस यंत्र लावले.तरुणीवर तो पाळत ठेवत होता. तिचा चोरून पाठलाग करायचा. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आला. तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार दिली . विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत ( Pune ) आहेत. 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.