Maval: …..’यामुळे’ लोकसभेच्या निकालाला होणार विलंब

एमपीसी न्यूज – लोकसभेचा निकाल अवघ्या 10 दिवसांवर आला आहे. निकालाची उत्कंठा असल्याने सर्वांचे लक्ष 23 मे रोजी होणा-या मतमोजणीकडे लागले आहे. यंदा मतमोजणी होताना ‘व्हीव्हीपॅट’च्या पावत्यांच्या पडताळणीमुळे निकालाला 2 ते 3 तास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेहमीपेक्षा तीन तास विलंबाने निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. 23 मे रोजी बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघातील एका बुथवरील ‘व्हीव्हीपॅट’च्या पावत्यांची पडताळणी होईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील विधानसभेतील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची पडताळणी होईल. एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच ‘व्हीव्हीपॅटची’ पडताळणी होईल. एकूण 20 केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची पडताळणी केली जाईल. या प्रक्रियेत थोडा वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालास 2 ते 3 तास विलंब होण्याची शक्यता असल्याने अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब होईल, अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.