Maval : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – लोणावळा (Maval) ग्रामीण पोलीस ठाण्यात लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी परंदवाडी येथे उघडकीस आली.

Nigdi : गदिमांच्या जयंती निमित्त दोन दिवसीय ‘गदिमा महोत्सव’

विजय शशिकांत मालपोटे (वय 35, रा. उर्से, ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नऊ वर्षीय पिडीत मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात 26 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली. संशयित आरोपी विजय मालपोटे याने पिडीत मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस विजय याच्या मागावर होते.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी परंदवाडी येथे झाडाला टॉवेलच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत विजय आढळून आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. आत्महत्येबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.